0

सोयाबीन स्वपरागसिंचित व सरळ वाण असल्याने स्वतः कडील बियाणे वापरू शकता.

१० ते १२ टक्के आद्र्ते खाली साठवलेले, कमीत कमी हाताळलेले, दोन वर्षाच्या आतील उत्पादन बियाणे म्हणून वापरू शकता

उगवण क्षमता चाचणी प्रक्रिया 

  • – प्रातिनिधिक (प्रत्येक पोत्यातून व पोत्याच्या वेगवेगळ्या भागातून) नमुना बियाणे घेऊन एकत्र मिसळावे
  • – यातील १०० बिया मोजून घ्याव्या
  • – स्वच्छ ओल्या गोणपाटावर १० ओळीत, प्रत्येकी दहा बिया ५ सेमी बाय ५ सेमी अंतरावर ठेवाव्या
  • – त्यावर दुसरे ओले व स्वच्छ गोणपाट झाकावे
  • – बियाणे हलणार नाही या पद्धतीने दुमडून सुरळी बनवावी
  • – रबरबँड लावून बंद करावे
  • NPK conso price
  • – प्लॅष्टिक बॅग मध्ये टाकून, थंड व अंधाऱ्या जागी, तीन दिवस ठेवावे
  • – तीन दिवसाने, उघडून, चांगले अंकुरलेले बियाणे मोजावे
  • – १०० पैकी किती बियाणे उगवून आले आहे, तितके टक्के उगवण क्षमता आहे असे म्हणता येते
  • – हा प्रयोग एकाच वेळी तीन सेट मध्ये केल्यास सरासरी उगवण क्षमता निघते
  • – ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी योग्य असते
  • – ७० टक्के उगवण क्षमता असल्यास एकरी ३० किलो बियाणे लागते
  • – उगवण क्षमता ७० टक्क्याच्या जितके कमी असेल तसे बियाणे जास्त वापरावे लागेल
  • – उदा: ६५ टक्के असेल तर
७० – ६५ = ५
५ x ०. ५ = २.५
(म्हणून ६५ टक्के उगवण क्षमता असेल तर ३०+२.५ = ३२.५ किलो बियाणे लागेल)
मित्रहो, ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली का? शेअर करायला विसरू नका. सोयाबीन वरील आमचे इतर लेख, सोयाबीन व्यवस्थापनात लागणारी उत्पादने व उन्हाळी व पावसाळी सोयाबीन चे पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर आधारित शेड्यूल पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा! शेड्यूल मोफत उपलब्ध आहे, खरेदी करून मोबाइल मध्ये साठवून ठेवा. 

आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published.

0

TOP

X
ऑफर्स वर ऑफर: ३००० रु च्या पुढील सर्व खरेदीवर १० टक्के सूट आणि ५००० रु च्या पुढील सर्व खरेदीवर २० टक्के सूट.
This is default text for notification bar